सामाजिक न्यायविभागातर्फे पत्रकारांसाठी कार्यशाळा

editor 1 Min Read
1 Min Read

धुळे (ब्युरो चीफ) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २६ नोव्हेंबर, २०२२ ते ६ डिसेंबर, २०२२ या कालावधीत ‘समता पर्व’ साजरा करण्यात येत असून, समता पर्वाचे औचित्य साधून आज (दि.३०) पत्रकारांसाठी ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवन मागे, साक्री रोड, धुळे येथे झालेल्या या कार्यशाळेत सामाजिक न्याय विभागाचे योगेश पाटील, जिल्हा माहिती कार्यालयचे विलास बोडके, राकेश महाजन, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी मनीष पवार हे मंचावर उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील पत्रकारांनी कार्यशाळेस उपस्थिती दर्शविली.
————–

Share This Article
Exit mobile version