मान्सून आला; पावसाचा जोर वाढणार!

editor 1 Min Read
1 Min Read

पुणे (प्रतिनिधी) – राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सोमवारपासून मराठवाडा, विदर्भात पावसाला सुरुवात होईल. तसेच, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट देत, आजपासून या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
शनिवारपासून वातावरणासह पावसामध्येही बदल होणार आहेत. त्यामुळे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांत चांगलाच पाऊस बरसणार असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरीला तर हवामान खात्याने ऑरेंट अ‍ॅलर्ट दिला आहे.राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचा दावा करत, सोमवारपासून मराठवाडा, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस बरसेल व त्यामुळे खरिपाच्या पेरण्या मार्गी लागतील, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
————–

Share This Article
Exit mobile version