– ठाकरेंच्या सभेने शिवसैनिकांत अभूतपूर्व जोश, राजकीय वातावरण तापण्याचे संकेत!
चिखली (विशेष प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिखलीतील तालुका क्रीडा संकुलात अतिविराट जाहीर सभा पार पडल्यानंतर, सभेतून बाहेर आलेल्या उत्साही शिवसैनिकांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे शहरातील रस्त्याच्या कडेला लावलेले पोस्टर फाडल्याचे दिसून आले. ही सभा रेकॉर्डब्रेक तर झालीच, पण शिवसैनिक व उपस्थित जनसमुदयात सळसळता उत्साह निर्माण करणारी ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील शिंदे गटाविरोधात जोरदार वातावरण तयार झाल्याचे दिसून आले. त्याच उत्साहाच्या भरात काही युवकांकडून खासदारांचे पोस्टर फाडले गेल्याचे दिसून आले आहे.
—————–

