बिबी येथे राज्यपाल कोश्यारींच्या प्रतिमेला जोड्याने हाणले!

editor 1 Min Read
1 Min Read

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घातला दुग्धाभिषेक

बिबी, ता. लोणार (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गैरउदगार काढणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचा प्रवक्ता त्रिवेदी याने महाराजांचा घोर अपमान करणारे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस बिबी यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येऊन राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमांना जोडे हाणण्यात आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

या आंदोलनप्रसंगी माजी समाज कल्याण सभापती अभयदादा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील बनकर, विठ्ठलभाऊ चव्हाण, अंबादास पाटील, खान तोफिक भाई जाकीर भाई, आकाश बनकर, अमोल बनकर, शाहीर चव्हाण, शंकर बनकर, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या लोणार तालुका युवती अध्यक्षा संजीवनी वाघ, माधव डुकरे, विजय बनकर, समाधान बनकर, अमोल गावडे, सय्यद साहेब, गजानन कुहीट,े सचिन मापारी, अरविंद चव्हाण व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
——————

Share This Article
Exit mobile version