– चिखली तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींचा समावेश
– मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश जारी
चिखली (एकनाथ माळेकर) – ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले आहेत. या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झालेल्या असून, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिताही लागू झालेली आहे. प्रशासक नियुक्त झालेल्या चिखली तालुक्यातील २७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये सद्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार असून, २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबरला संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार असून, अर्ज दाखल करण्याची मुदत २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर आहे. तर अर्ज छाननी ०५ डिसेंबर रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याचा दिनांक ७ डिसेंबर आहे. तर, निवडणूक चिन्ह वाटप ७ डिसेंबर दुपारी ३ नंतर होणार आहे. १८ डिसेंबरला मतदान झाले की, २० डिसेंबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. तसेच, २३ डिसेंबररोजी निकालाची अधिसूचना प्रसिद्ध होऊन, नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येईल. त्यामुळे निवडणूक कालावधीसाठी संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकराज राहणार असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध खात्यातील अधिकार्यांची ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा प्रशासक नियुक्ती संदर्भातील आदेश वाचण्यासाठी येथे क्लीक करा!
ग्रा.पं.प्रशासक नियुक्ती आदेश २०२२

