बिबी येथे शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

editor 1 Min Read
1 Min Read

लोणार (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील बिबी येथे नारायण बबन साळवे या शेतमजुराने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज (दि.१०) रोजी सकाळी साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण काय, याबाबत पोलिस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिबी येथील रहिवासी नारायण बबन साळवे यांनी येथील गट नंबर २८९ मध्ये अभय चव्हाण यांच्या शेतामध्ये बांधावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने साळवे परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल सरदार हे करत आहेत. नारायण साळवे यांनी आत्महत्या का केली, याबाबतचा तपास पोलिस करत आहे. तथापि, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
—————-

Share This Article
Exit mobile version