पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारातील दुर्घटना
पाचोड (विजय चिडे) – बीड येथील जिल्हा शल्य चिकित्सक रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी बीड वरून भरधाव औरंगाबादकडे काही कामानिम्मित जात असताना त्यांच्या कारचालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे ता.पैठण शिवारात शनिवारी(दि.१८)रोजी सकाळी आकरा वाजेच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले आहे.
बीड येथून सकाळी कार (क्र.एम.एच.२३ए.एस.९२९४) ही औरंगाबादकडे जात असताना आडगाव जावळे शिवारात महामार्गावरील वळणाजवळ चालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे चालकांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या खाली जाऊन पलटी झाली. यामध्ये डॉ. मितल निवृत्ती लांभोरे या गंभीर जखमी झाल्यात. अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांने तात्काळ पाचोड पोलिसांसह भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रूग्णवाहिकेला दिली असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना औरंगाबाद येथील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्ग दर्शनाखाली बीट जमादार संतोष चव्हाण, पोलिस नाईक रविंद्र आंबेकर हे करीत आहेत.

