आळंदीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कृषीमंत्री सत्तार यांचा निषेध

editor 1 Min Read
1 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचे निषेधार्थ जाहीर निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत केलेल्या सत्तार यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून राज्यात तसेच आळंदीत याचे तीव्र पडसाद उमटले.

आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने निषेधाचे आंदोलन करीत वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सत्तार यांच्यावर यावेळी टीका करण्यात आली. आळंदी येथील महाद्वार चौकात निषेध तसेच , घोषणा देत संतप्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, मृदुल भोसले पाटील, महीला शहराध्यक्षा रुपाली पानसरे, तालुका उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे, युवक शहराध्यक्ष सौरभ गव्हाणे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे, माजी नगरसेविका मंगलाताई वेळकर, विलास सोपान कुऱ्हाडे, भाऊसाहेब कोळेकर, निसार सय्यद, शुभम जाधव, संदेश तापकीर, सुशिला मंजुळे, आरिफभाई शेख, निखिल बनसोडे, ओम गंगोत्री, संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version