चिखली (शहर प्रतिनिधी) – महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची व साहित्यिकांची बैठक समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहीर प्रेमसागर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.६) डोंगर खंडाळा येथे संपन्न झाली. या बैठकीमधे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहीर प्रेमसागर कांबळे यांनी महाराष्ट्र कलावंत न्याय हक समितीची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करून सदर कार्यकारिणी जाहीरित्या जाहीर केली. या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष साहेबराव जाधव सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीतील सर्वच पदाधिकार्यांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ प्रेमसागर कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या बैठकीला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कलावंत व साहित्यिक यांची उपस्थिती होती संचलन दीपक महाराज सावळे यांनी केले तर रामदास मलवार यांनी आभार मानले.

