मेहकर/लोणार (तालुका प्रतिनिधी) – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राज्यातील जबाबदार महिला नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली होती. त्याचा आज (दि.८) मेहकर व लोणार तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. लोणार, बिबी, डोणगाव, हिवरा आश्रम येथे मंत्री सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे हाणण्यात आले. तसेच, महिलांनी चपलांचा हार घातला. डोणगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाऊ पाटील, संजय वडतकर, संपतबाबू देशमुख, अभय चव्हाण आदी नेते रस्त्यावर उतरले होते. यावेळी मंत्री सत्तार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारीदेखील दाखल करण्यात आल्यात.
लोणारमध्ये सत्तारांच्या पुतळ्याला काळे फासले, पोलिसांत तक्रार दाखल लोणार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोणार पोलिस स्टेशन येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सत्तार यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित मंत्री मंडळातून बडतर्फ करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड घोषणा बाजी करत शहरांतील मुख्य चौकात एकत्रित आले आणि सरकारविरोधात तथा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सत्तार यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडेमारो आंदोलन करण्यात आले, या नंतर स्थानिक पोलीस ठाण्यात सत्तार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सद्या शेतकरी तथा सर्वासामान्य जनता अनेक समस्याने ग्रस्त आहे. त्यांच्या समस्याकडे लक्ष वेधले जाऊ नये, यामुळेच मंत्री सत्तार यांनी सस्ती प्रसिद्धी मिळावी म्हणून संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. सत्तार यांना मंत्री मंडळातून बडतर्फ करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेचा परिचय द्यावा, असे आवाहन या प्रसंगी जेष्ठ नेते किशोर भाऊ पाटील यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष पुरषोत्तम पडघान, डॉ. विक्रांत मापारी, तालुका अध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा निरीक्षक डॉ.भास्कर मापारी, इब्राहिम शेख, तौशिफ अली, मन्नान पठाण, शेख चांद भाई, हबीब पठाण, नीलेश चव्हाण, मेराज पठण, नंदकिशोर डव्हळे, बंडू पडघान, महादेव पवार, लालमिया, सुभाष पाटील, सचिन मापारी, धंनजय मापारी, अक्षय मापारी, नंदू पिसे, मोसीफ खान, भीमराव ताकतोडे, समाधान भानापुरे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— डोणगावात सत्तार यांच्या पुतळ्याला महिलांनी हाणल्या चपला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा संसद रत्न सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत केलेल्या बेताल वक्तव्यांचा निषेध करत आज डोणगाव येथे चक्काजाम आंदोलन करून महिलांच्या हस्ते प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारून पुतळ्याचे दहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पाठिंबा देत आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेहकर तालुका कार्याध्यक्ष यासीन बेग यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार आपण हिंदुत्वासाठी ज्या गटात गेलात त्या गटात आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण व आदर्श विसरलात, महिलांचा अपमान या महाराष्ट्रात अजिबात सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी दिली. यावेळी महिलांच्या हस्ते सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारून निषेध घोषणा देत पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी महिला तालुका अध्यक्ष मैफुजा परविन, यास्मिन बी. शेख मूलचंद, शाहीन शेख हरून, खालिदाबी. शेख रफिक, जुलेखा बी.शेख करीम, सौ. रंजना घनसावंत, कल्पना मोरे, माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय पाटील आखाडे, ज्येष्ठ नेते संपतराव बापू देशमुख, तालुका अध्यक्ष सागर पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाजीम भाई कुरेशी, ग्रा.पं.चे गटनेते शिवचरण आखाडे, उपसरपंच श्याम इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील पळसकर, शिवसेना नेते (ठाकरे गट) तालुका अध्यक्ष निंबाजी पांडव, अर्जुनराव बाजाड, महावीर मोरे, राकॉ तालुका उपाध्यक्ष गजानन पळसकर, विजुभाऊ आखाडे, माजी उपसरपंच सैय्यदनुर आतार, माजी उपसरपंच जोईब खान, सुबोध आखाडे ,पंकज पळसकर, मुरलीधर लांभाडे, मनोहर खोडके, साबीर शहा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विष्णुपंत पळसकर, अनंता आखाडे, भारत विडोळे, विश्वनाथ पळसकर, वैभव नरवाडे, कार्तिक पळसकर, बोरखंडे इत्यादी महाविकास आघाडी घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांचे आभार शिवसेना (ठाकरे गट) चे नेते हेमराजजी शर्मा यांनी मानले. यावेळी डोणगावचे ठाणेदार नीलेश आपसुंदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
— हिवरा आश्रममध्ये मंत्री सत्तारांचा पुतळा जाळला अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ हिवरा आश्रम येथे राष्ट्रवादीकडून तीव्र आंदोलन वâरण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जि.प.सदस्य व कार्यकर्त्यांनी मंत्री सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन केले. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, अशोकराव लंबे, शालीकराम महाकाळ, सुरेश सरकटे, सुजीत शेळके, गजानन दळवी, प्रशांत बोरे, रामेश्वर धंदर, विजय सरकटे, निलेश काळे, राजेशराव काळे, कडुबा लंबे, शेषराव काकडे, भागवत लहाने, राजु वडतकर, अमोल काकडे, महेश लोढे, सौरभ दळवी, भुषण अवचार, प्रसाद शेळके, निलेश काळे उपस्थित होते.
— बीबी येथे सत्तारांच्या पुतळ्याला चप्पलचा हार लोणार तालुक्यातील बीबी येथे अभय चव्हाण, भिकाजी इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोषणाबाजी व प्रतीकात्मक पुतळ्याला चप्पल हार घालून निषेध करण्यात आला. मंत्री सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक होऊन पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटले आहे. सत्तार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी समज द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश इंगळे यांनी केली. यावेळी अभय चव्हाण, राजेश इंगळे, संतोष बनकर, अंबादास खंड, जाकीर भाईसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————–