बक्षीस जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वॉर्ड रचना झाली आहे. त्यानंतर हरकती आणि सुनावणी व आरक्षण सोडत निघणार आहे. विशेष म्हणजे या वार्ड रचना मध्ये कासेगाव गणाला जोडलेली मुळेगाव, दोन्ही पंचायत समिती गणाला जोडली आहेत. त्यामुळे पूर्ण राजकीय गणित बदलले आहे. बोरामणी गट हा गेली अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात काँग्रेसकडून पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करीत आहेत. तसेच सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महा विकास आघाडीच्या पक्षाची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आघाडी बाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना स्वतंत्र लढणार की आघाडी करून राहणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सध्या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नेत्याकडून तयारी सुरू केली आहे.
सध्या बोरामणी गटातून स्व. उमाकांत राठोड यांचे चिरंजीव विजय राठोड हे काँग्रेस कडून सध्या निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. या बरोबरच विद्यमान बोरामणी पंचायत समितीचे सदस्य धनेश अचलारे हे देखील तिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस कडून संगदरीचे नागराज पाटील, मुळे गावचे उपसरपंच शिवराज पाटील व महेश माने हे देखील ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत आहेत. या बरोबरच भाजप पक्षाकडून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदार विभुते यांना तिकीट देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत या भागांमध्ये भाजप पक्षाला मताधिक्य मिळाले असले तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये तसेच राहणे शक्य नाही. कारण सध्या राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
