जळक्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने शेतकर्‍याची सोयाबीनची सुडी जाळली, ९० हजाराचे नुकसान

editor 1 Min Read
1 Min Read

चिखली (विशेष प्रतिनिधी) – लोणार तालुक्यातील मांडवा येथील शेतकर्‍याची अज्ञात जळक्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने सोयाबीनची सुडी जाळून टाकल्याने, या शेतकर्‍याचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिस या जळक्या प्रवृत्तीच्या व्यक्तीला लवकरच अटक करून त्याच्याकडून हे ९० हजार रुपये वसूल करून, वरून त्याच्या कठोर कायद्याखाली गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

लोणार तालुक्यातील बिबी गावाजवळ असलेल्या मौजे मांडवा येथील शेतकरी धोंडू दगडू बुरूकुल यांचे गट क्रमांक ७४ मध्ये अडीच एकर शेत आहे. त्यात त्यांनी सोयाबीनची सोंगणी करून गंजी मारली होती. अशातच जळक्या प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सोयाबीनच्या गंजीला परवा दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आग लावून ती सुडी जाळून टाकली, व त्यामध्ये त्यांचे २५ पोते सोयाबीन अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती बुरूकुल यांनी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देऊन दिली आहे. पुढील तपास पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख हे करत आहेत. ग्रामसेवक कुटे, कृषी सहायक साखरे मॅडम यांनी पंचनामा करून पुढील प्रशासनात मदतीकरिता दाखल केलेल आहे.
—————-

Share This Article
Exit mobile version