संविधान जनजागर रॅलीचे धुळ्यात जोरदार स्वागत

editor 1 Min Read
1 Min Read

धुळे (न्यूज ब्युरो चीफ) – संविधानाचा प्रचार- प्रसार करण्यासाठी १० ऑक्टोंबररोजी महाड येथून भारतीय संविधान जनजागर करण्यासाठी भारतीय संविधान जनजागर प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज या रॅलीचे धुळे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.

संविधान बांधिलकी महोत्सव, नागरी संयोजन समितीच्यावतीने दिवसभर स्वागत व विविध प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संविधान बांधिलकी महोत्सव आयोजन २००७ सालापासून करण्यात येत आहे. त्याची दरवर्षी धुळे महानगर नागरी संयोजन समिती गठीत करण्यात येत असते. त्यामधे धुळे शहरातील विविध क्षेत्रातील अनेकविध संघटना, संस्थांचा सहभाग घेतला जातो. संविधान बांधिलकी महोत्सव धुळे महानगर नागरी संयोजन समिती २०२२-२३ यात्रेत अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट एम एस पाटील, निमंत्रक डॉ संजय पाटील व प्रा डॉ गोपाळ निंबाळकर यांच्यासह सहभागी सर्व संघटना, संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सर्व धर्म संघाचे शेख हुसैन गुरुजी, मूव्हमेंट फॉर पीस अ‍ॅण्ड जस्टिसचे आबिद शेख व अशफाक शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि महा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Share This Article
Exit mobile version