वर्धा ते आर्वी मार्गावर कार झाडाला धडकल्याने दोन युवक जागीच ठार

editor 1 Min Read
1 Min Read

वर्धा (विशेष प्रतिनिधी) – वर्धा ते आर्वी मार्गावरील कामठी शिवारात रात्रीच्या सुमारास भरधाव कार झाडाला धडकल्याने कारमधील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. मरण पावलेल्यांत प्रज्ज्वल राजेंद्र डंभारे (वय २५) आणि राहुल ओमदेव धोंगडे (वय ३५) यांचा समावेश असून, दोन्ही याच मार्गावरील आंजी मोठी गावचे रहिवासी आहेत. मरण पावलेला प्रज्ज्वल डंभारे हा भीमटायगर सेनेचा माजी जिल्हाप्रमुख होता. रात्री अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रजवल डभारे

अपघातानंतर दोघांचेही मृतदेह कारमध्येच रात्रभर पडून होते. आज पहाटे फिरायला जात असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना ही घटना दिसली. त्यानंतर खरांगणा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. कारने झाडाला दिलेली धडक येवढी जोरात होती की दोन्ही युवकांचे मृतदेह कारमधून काढताना गॅसकटरच्या मदतीने कारचे पत्रे कापावे लागले. जेवण करायला बाहेर जात असल्याचे घरी सांगून दोन्ही युवक एमएच ३२ सी ८४५३ क्रमांकाच्या कारने जेवायला गेले होते. जेवण करून परतानाच आंजी मोठी गावापासून जेमतेम पाच किलोमीटर अंतरावरच चालकाचे कारवरील नियंत्रण गेले आणि कार झाडावर जोरात धडकली. रात्री हा अपघात कोणालाही दिसला नाही. त्यामुळे मृतदेह कारमध्येच पडून होते. पोलिसांना कळल्यानंतर सकाळी पोलिस घटनास्थऴी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवचिकित्सेकरीता रवाना केले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Share This Article
Exit mobile version