जामखेडचे प्रसिद्ध भांडे व्यापारी महेंद्र बोरा यांचे कार अपघातात निधन

editor 1 Min Read
1 Min Read

कर्जत/जामखेड (तालुका प्रतिनिधी) – जामखेड येथील प्रसिद्ध भांडे व्यापारी महेंद्र बोरा यांचे कार पलटी होऊन दुर्देवी निधन झाले आहे. नगर – जामखेड रोडवरील पोखरी येथे आज ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात बोरा यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा, सून जागृती आणि नातू भूषण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर, तातडीने नगर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

महेंद्र बोरा हे सहकुटुंब देवदर्शनासाठी राजस्थानला गेले होते. देवदर्शनाहून परत येत असताना नगर-जामखेड रोडवरील पोखरी येथे त्यांची कार पुलाच्या खाली गेली व पलटी झाली. अपघात इतका भीषण होता, की कारचा चक्काचूर झाला. महेंद्र बोरा यांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर तिघे गंभीर जखमी झालेले आहेत. या घटनेने नगर व जामखेडच्या बोरा कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अधिक तपास जामखेड पोलिस करत आहेत.

Share This Article
Exit mobile version