मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेलाच सुरुंग लागल्याचे सामोरे आले आहे. एक अनोळखी कार चक्क मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसले. अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था असतानाही कुणीही या कारला अडवले नाही. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा उच्चस्तरीय आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र््यांच्या जीविताला असलेला धोका पाहाता, आजचा प्रकार अक्षम्य असल्याची माहिती खासगीत वरिष्ठ स्तरीय सूत्राने दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या वर्षा या शासकीय बंगल्यावरून राजभवनावर गेले होते. राज्यपालांना शुभेच्छा देऊन परत येत असताना, त्यांच्या ताफ्यात अचानक एक कार घुसली. परंतु, गाड्यांचा वेग कमी असल्याने अपघात टळला. विशेष म्हणजे, ताफ्यात ही कार घुसत असताना कुणीही ती अडवली नाही. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांना अतिरिक्त सुरक्षा असताना हा प्रकार घडला आहे.
————
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेला सुरुंग!

