आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील संत श्री जलाराम सत्संग मंडळ, आळंदी पुणे यांच्या वतीने परंपरेने संत जलाराम बाप्पांच्या लक्षवेधी प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजलेल्या वाहनातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे आळंदी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रासह गुजरात मधील जलाराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आळंदीत जलाराम जयंती दिनी परंपरागत धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. जलाराम बाप्पांचे प्रतिमेची लक्षवेधी मिरवणूक झाली. मिरवणुकीचे शहरात स्वागत करण्यात आले. जयंती दिनी धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम,पूजा पाठ , महाप्रसाद , रक्तदान शिबीर उत्साहात झाले.
जलाराम जयंती निमित्त रक्तदान शिबिरात भाविक भक्तांनी रक्तदान केले. महाप्रसाद वाटप,सांस्कृतिक कार्यक्रम परंपरेने मोठ्या भक्तिमय उत्साहात झाले. यावेळी विविध रंगी फुलांनी लक्षवेधी सजविलेल्या वाहनावरील श्री जलाराम बाप्पाची प्रतिमा भाविकांचे आकर्षण ठरले. मंदिर व परिसरात पुष्प सजावट , विद्युत रोषणाई ने परिसर उजळून निघाला. कोरोनाच्या महामारीचे संकटा नंतर यावर्षीची जलाराम जयंती भाविकांचे मोठ्या संख्येने आणि उत्साहात पार पडली.

