साताऱ्याच्या ४ तडीपार गुन्हेगारांना २ पिस्टलसह केले जेरबंद

editor 2 Min Read
2 Min Read

बुलडाणा(जिल्हा प्रतिनिधी) जळगाव जा. ह जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पाश्र्वभुमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी वाढते गुन्हे व चोरींच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस विभागाला कारवाईचे आदेश दिले होते. गुरुवार १६ जूनच्या सायंकाळी ५ वाजता जळगाव जामोद पोस्टे. हद्दीमध्ये पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी नाकाबंदी करीत असतांना संशयास्पद एम.एच.११ एल-९५९४ क्रमांकाची तवेरा गाडी येतांना दिसली. सदर गाडीची तपासणी केली असता आरोपींनी प्रथम उडवा-उडवीचे उत्तर दिले नंतर पोलिसी खाक्या दाखवताच गाडीमध्ये २ देशी पिस्टल व ६ लाख १५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या बुरहानपुर रोडवरील निमखेडी फाट्याजवळ १६ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता दरम्यान नाकाबंदी दरम्यान जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना एक संशयास्पद लाल रंगाची तवेरा गाडी येताना दिसली गाडीला थांबवून तिची तपासणी केली असता गाडीमध्ये परशुराम रमेश करवले वय २३ रा.सोमवार पेठ कराड जि. सातारा, अभिजीत दिलीप येडगे वय १९ रा. अहिल्यानगर मलकापूर ता.कराड, दिनेश विजय बुरुंगले वय २२ रा. सातारा, तसेच कुणाल बाबुराव हिवरे वय २३रा. रेहटे ता. कराड या ४ जणांचा तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार मोबाईलसह तवेरा गाडी असा एकूण ६ लाख १५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपासाकरीता चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ठाणेदार सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार, पोकाँ.अमोल वनारे, चालक पोकाँ.सुनील वावगे, पोहेकाँ. निलेश पुंडे, उमेश शेगोकार, पोकाँ. सचिन राजपूत, पोकाँ. प्रशांत डामरे यांनी केली आहे

 

आरोपी सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार..

आरोपी हे सातारा येथील गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांच्यावर सातारा पोलीस स्टेशन अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. याबाबत सातारा येथील पोलिसांना कळल्यानंतर तेथील एलसीबी पथक येऊन त्यांनी सदर आरोपींवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून हे तडीपार असल्याचे सांगितले, अशी माहिती जळगाव पोस्टे.ठाणेदार सुनिल अंबुलकर यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र ला बोलतांना दिली.

 

Share This Article
Exit mobile version