उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – गोलेगांव ता.वाशी.जि.उस्मानाबाद येथील गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश लहू कुकडे यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेश कुकडे हे वाशी तालुक्यातील गोलेगांव येथील रहिवासी असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल लौकिक अर्बन को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि. चेअरमन निवांत राजे देशमुख यांनी सत्कार केला. याप्रसंगी व्हा.चेअरमन रामराजे मोळवणे,सचिव शहाजी चेडे,संचालक आण्णा मोळवणे व बजाज फायनान्सचे कदमसाहेब उपस्थित होते.

