कचनेर येथे शाळापूर्व तयारी मेळावा

editor 1 Min Read
1 Min Read

पाचोड :  कचनेर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत बुधवारी (ता. १५) शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अलीम पठाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच अंकुश फतपुरे होते. याप्रसंगी नवागत मुलांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात येऊन त्यांना चॉकलेट, खाऊ व गोडभात देण्यात आला.

विदयार्थाच्या स्वागत व पुस्तक वाटपानंतर या मेळाव्याचे उद्घघाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अलीम पठाण व अंकुश फतपुरे यांनी फीत कापून केले.  याप्रसंगी नवागत विदयार्थ्याच्या पावलांचे ठसे “पहिले पाऊल” म्हणून घेण्यात आले.  प्रांगणात लावण्यात आलेल्या विविध सात स्टॉलवर नवागत विद्यार्थाच्या वेगवेगळ्या क्षमता तपासण्यात आल्या.  प्रास्ताविक मुख्याध्यापक ब्रम्हणाथ बी. एस. यांनी तर सूत्रसंचालन निकम आर. आर. यांनी केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य कल्याण भानुसे,  श्रीमती कदम,  श्रीमती पवार,  श्रीमती काचोळे,  श्रीमती बावीस्कर,  श्रीमती डाके यांचेसह विद्यार्थी, ग्रामस्थ, पालकवर्ग आदी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version