सप्तशृंगगडावर श्री सप्तशृंगी मातेचे २४ तास दर्शन होणार!

editor 2 Min Read
2 Min Read

दिवाळीनंतरच्या कालावधीत भाविकांच्या गर्दी लक्षात घेता निर्णय

वणी/आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सप्तशृंगगड येथील दिवाळी उत्सव कालावधीत आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड श्री सप्तशृंगी मातेची दर्शन व्यवस्था २४ तास सुरू राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली. परंपरेने आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळी उत्सव सालाबाद प्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर गुरुवार पासून ( दि २७ ऑक्टोबर ) ते रविवार ( दि. १३ नोव्हेंबर ) या कालावधीत मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवून भाविकांना श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकालावधीत भाविकांना श्रींचे दर्शनाची पर्वणी लाभत आहे.

दिवाळी उत्सव कालावधी दरम्यान राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असते, तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, नवरात्र उत्सवात व मागील २ वर्षात कोविड-१९ संसर्गजन्य परिस्थितीमुळे श्री भगवती दर्शनासाठी येवू न शकलेले भाविक यांची संख्या विचारात घेता अचानक होणाऱ्या संभाव्य गर्दीची परिस्थिती टाळण्याच्या हेतूने श्री भगवती मंदिर हे २४ तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवल्यास भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण येऊ नये यासाठी गर्दी विभागून भाविकांना श्री भगवती दर्शनाचा विशेष लाभ घेता येण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या दृष्टीने सदरचा निर्णय विश्वत संस्थेने घेतला आहे. दरम्यान आवश्यते नुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांना सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यानच्या कालावधीत भाविकांनी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करण्याचे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version