व्हाटसअप बंद पडले, यूजर्सचा जीव टांगणीला!

admin 1 Min Read
1 Min Read

मुंबई (प्राची कुलकर्णी) – ऐन दिवाळीच्या सणात एकीकडे शुभेच्छा संदेश पाठविण्याची लगबग सुरु असताना व्हाटसअप बंद पडले आहे. मेसेज जात किंवा येत नसल्याची तक्रार यूजर्सनी केली असून, त्यामुळे शुभेच्छा मेसेज तर खोळंबून पडलेच, पण इतरही कामे ठप्प पडल्याने यूजर्सचा जीव टांगणीला लागला होता.

मुंबई, पुणे, महाराष्ट्रातील काही शहरे, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्लीसह बहुतांश भागात अचानक व्हाटसअप बंद पडल्याने खळबळ उडाली होती. सर्वर डाऊन झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जवळपास ३० हजार यूजर्सने व्हाटसअपकडे तक्रार दाखल केली होती. व्हाटसअपची मेसेजिंग सर्विस बंद पडल्याने हा गोंधळ उडाला होता. दुसरीकडे, फेसबुक, ट्वीटरसह इतर साेशल मीडियावर जाेरदार मिम्सही व्हायरल हाेत हाेते.
————

Share This Article
Exit mobile version