कूंडलचा मालपाडा दुर्घटनेतील मयत मुलांचा परिवाराना शासकीय मदत देणार- ना. ॲड. के.सी.पाडवी

editor 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार(जिल्हा प्रतिनिधी)- दोन दिवसापूर्वी धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावर किराणा दुकान वर जाणाऱ्या तीन चिमुकल्याचे खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाले होते.सदर घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ उडाली होती.  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी या तिघा लहान मुलांच्या परिवाराला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

या परिवाराच्या पाठीशी पूर्ण संवेदना असून त्यांना पूर्ण शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी सदर दुर्घटनेच्या संदर्भात तहसिल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत दूरध्वनी वर चर्चा करून शासकीय मदती साठी लागणारे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत

Share This Article
Exit mobile version