चार लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

editor 1 Min Read
1 Min Read

वाशिम (जिल्हा प्रतिनिधी) – वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या चार पोलीस कर्मचार्‍यांना दहा हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध (एसीबी) विभाग अमरावतीच्या अधिकार्‍यांनी रंगेहात अटक केली आहे.
अवैध दारू विक्री व जुगाराचा धंदा सुरळीत चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून दहा हजार रुपये देण्यासाठी पोलीस कर्मचारी गणेश भगवान बर्गे, दिनेश कांतीलाल राठोड, रमेशराव चव्हाण, केदारेश्वर फुलूउंबरकर यांनी संबंधिताला तगादा लावला होता. तक्रादाराला हप्ता द्यायचा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे तक्रार दिली होती, त्यावरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी पोलीस कर्मचारी गणेश बर्गे हे तक्रारदाराला वारंवार रेड टाकण्याची भीती घालत होते तर केदारेश्वर फुलउंबरकर हे बिट जमादारामार्फत ठाणेदारांना भेटण्यासाठी तगादा लावून, हप्ता पोलीस स्टेशनला जमा करण्यास सांगत होते. या कारवाईने वाशिम पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Share This Article
Exit mobile version