कारेगाव फाट्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, नशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव!

editor 1 Min Read
1 Min Read

– इर्टिगावाल्याने अचानक दाबला ब्रेक, कंटेनर इर्टिगाला, मालवाहू गाडी कंटेनरवर आदळली

लोणार (विनोद पाटील तेजनकर) – सुलतानपूर – औरंगाबाद मार्गावरील कारेगाव फाट्याजवळ पहाटे साडेनऊ वाजता तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात केवळ नशीब बलवत्तर म्हणून इर्टिगा गाडी व मालवाहू गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला. परंतु, या वाहनांचे मोठे नुकसान झाले. एका मुलाला किरकोळ दुखापत वगळता इतर कुणाला काही झाले नाही.

सविस्तर असे, की समोर भरधाव जाणार्‍या इर्टिगा गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे गाडीच्या मागे असलेल्या कंटेनर चालकाला आपले वाहन कंट्रोल झाले नाही. तरीही त्याने तातडीने ब्रेक दाबल्याने इर्टिगा गाडीतील प्रवाशांचे जीव वाचले. या कंटेनरचे किरकोळ नुकसान झाले. परंतु, कंटेनरच्या मागून येणारी मालवाहू गाडीदेखील कंटेनरवर जाऊन आदळली. अचानक ब्रेक दाबल्याने या गाडीच्या चालकाने वाहन कंट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तरीही धडक बसल्याने या मालवाहू गाडीचे नुकसान झाले आहे. तसेच, मालवाहू गाडीत बसलेल्या एका मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. त्याला तातडीने दवाखान्यात हलवल्याने त्याचे नाव कळू शकले नाही. या तिहेरी व विचित्र अपघातात इर्टिगा गाडी, व मालवाहू गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी जीवितहानी टळली नाही. याप्रकरणी लोणार पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
————–

Share This Article
Exit mobile version