क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने चुलत भावाने केला भावाचा खून

breakingmah 1 Min Read
1 Min Read

मलकापूर(ब्रेकिंग महाराष्ट्र):- क्षुल्लक कारणावरून दोघा चुलत भावामधे वाद झाल्याने एकाने दुसऱ्यावर धारदार सूऱ्याने वाद करू खून केला आणि स्वतचं पोलीस स्टेशमध्ये हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथे उघडकीस आली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील प्रदीप पद्माकर वानखेडे वय 34 व अशांत अशोक वानखेडे हे दोघे चुलत भाऊ आहेत .दरम्यान 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागील परिसरात प्रदीप व अशांत या दोघांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला . या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद एवढा विकोपाला गेला की अशांत वानखेडे याने प्रदीप वानखेडे याच्या पोटात धारदार सुरा खुपसला. तो एवढ्यावर न थांबता अशांतने प्रदिपच्या बरगड्यावर सपासप वार केले. त्यामुळे प्रदीप रक्त्याच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर अशांत वानखेडे हा तेथून पसार झाला आणि थेट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत चुलत भावाचा खून केल्याची कबुली दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीप ला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात नेले मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास तपासणी करून मृत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहे.

Share This Article
Exit mobile version