आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : फुलांची रास, चंदनाचा सुवास, दिव्यांच्या रांगा, अंगणी रांगोळीचे सडे…..नवे पर्व, विचार नवे आली दिवाळी.. आली दिवाळी पसरण्या नव्या आकांक्षांचे घडे……अशा सर्व सुमंगल वातावरणात व सुविचारांत दीपोत्सव सोहळ्याची सुरुवात आळंदीत दिव्यांच्या रोषणाईत दिवाळी ध्यास परिवाराचे वतीने साजरी करण्यात आली.
अनंतराव तेलंग यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. प्रकाश टाकळकर यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीरूप मार्गदर्शन करत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. बाबाजी काळे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी व भारत तेजाची पूजा करणारा देश अशी माहिती देत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विधितज्ज्ञ निलेश चौधरी यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. विश्वस्त चंद्रकांत लिंगायत विद्यार्थ्यांना फटाके कोणते वाजवावेत याबद्दल मार्गदर्शन केले. विश्वस्त मुकुंद कुलकर्णी सर विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. उपशिक्षिका मनिषा दरेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उपशिक्षिका स्मिता रंधवे यांनी केले . तत्पूर्वी स्वागत गीत गायन झाले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

