पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अंकित गोयल

editor 1 Min Read
1 Min Read

पुणे (प्रतिनिधी) – पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्य सरकारने गुरूवारी रात्री पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. यापूर्वी ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. दरम्यान, डॉ. अभिनव देशमुख यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहे.

अंकित गोयल हे यापूर्वी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे गोयल चर्चेत आले होते. त्यांची नियुक्ती आता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणूका, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासमोरे आव्हान असणार आहे.

Share This Article
Exit mobile version