विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी वर्ध्याचे प्रदीप दाते

editor 1 Min Read
1 Min Read

वर्धा (विशेष प्रतिनिधी) – विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी साहित्य चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप दाते यांची कार्यकारिणीच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत निवड करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाच्या नागपूर येथील सांस्कृतिक संकुलातील कार्यालयात विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनानंतर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.

विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रदीप दाते यांच्या नावावर अध्यक्षपदाकरीता शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप दाते यांना संस्थात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव असून, ते मागील सुमारे चार दशकांपासून सामाजिक, सांस्कृतिक तसेच व शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय योगदान देत आहेत. यशवंतराव दाते स्मृती प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष असून, अनेक संघटनांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. विदर्भ साहित्य संघासोबत मागील तीन दशकांपासून ते संबंधित असून, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात ते विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. राज्यातील अनेक सामाजिक कार्यकत्यांसोबत तसेच साहित्यिकांसोबत त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यांच्या नेतृत्वात विदर्भ साहित्य संघाचे कार्य समर्थपणे पुढे जाईल, असा विश्वास कार्यकारिणीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीनंतर जिल्ह्यातीलच नव्हे तर विविध जिल्ह्यातील साहित्यिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share This Article
Exit mobile version