पाचोड (विजय चिडे) – पैठण तालुक्यातील नांदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर शासन दर महिन्याकाठी लाखो रूपये खर्च येथील कार्यरत असणार्या वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांच्या पगारावर करीत आहे. मात्र हे अधिकारी मुख्यालयी राहत नाही तर येत पण नाही. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणार्या रूग्णांना’इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांची झाली आहे. खासगी रुग्णालयातील उपचार खिशाला परवडत नाही आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात’राम’ राहिला नसल्याने रुग्णांची मोठी फरफट होत आहे.
येथे उपचार घेण्यासाठी येणार्या सर्व रूग्णांना वेळेत उपचार भेटावे यासाठी शासनाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कजुअल्टी मेडिकल आफिसर २, मल्टी प्रपोज वर्कर ६, नर्स ६, शिपाई ३, लँब टेन्किशियन १, फार्मासिस्ट १, सुपर वायर ३, ऐवढ्या अधिकार्यांची व कर्मचार्यांची नियुक्ती केलेली असतानाही येथील आरोग्य केंद्र वार्यावर असल्याचे पाहावयास मिळत आहे.
आरोग्य केंद्राच्या परिसराचा फेरफटका मारल्यास सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पहायला मिळत असून, आरोग्य केंद्राच्या आतील भागात पान खाऊन थुकलेल्या भिंती, प्रत्येक रूममध्ये डासांचा वावर अशी दैन्यावस्था झालेली आहे. त्यामुळे आरोग्य केद्रांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.
तसेच येथे उपचार घेण्यासाठी येणार्या रुग्णांच्या नातेवाइकांना रात्रीच्या वेळी आवारातच पथारी पसरावी लागत आहे, मात्र आता नूकतेच पावसाळा सुरु झाला आल्यामुळे रात्री अपरात्री केव्हाही पावसाची पडू शकतो. त्यामुळे रूग्णांना सोबत येणार्या नातेवाईकांची चांगलीच फजित होत असून, अनेकांची गैरसोय होते आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी या गंभीर प्रकाराकडे जातीने लक्ष करजेचे असल्याचे नागरिकांतून बोले जात आहे.