वडजी सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवड

editor 1 Min Read
1 Min Read

पाचोड (विजय चिडे) – पैठण तालुक्यातील वडजी येथील सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. त्या प्रसंगी सरपंच भाऊसाहेब गोजरे यांचा नेतृत्वाखाली विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सोसायटी निवडणूक अधिकारी भारती व सचिव इंगळे यांनी पार पडली.
चेअरमन म्हणून डॉ.बाबासाहेब आण्णा गोजरे व व्हाईस चेअरमन कल्याण ताकपीर यांची निवड करण्यात आली असून, सोसायटी सदस्य गोविंद गोजरे, संतोष वाघमारे, आबासाहेब गोजरे, देविदास ताकपीर, कैलास सुकासे, रामेश्वर गोजरे, राजु गोजरे, योगेश झरकर, मधुकर झिने, विठ्ठल ताकपीर, शरद सहकारी कारखाने संचालक सुभाष गोजरे, भाऊसाहेब जिजा गोजरे, श्रीमंत सुकासे, संतोष भांड, सुभाष नाना भांड, व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version