सोलापूर : बारावीच्या परीक्षेत अहोरात्र अध्ययन करून चांगले गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा क्षेत्रात करिअर केले पाहिजे पालकांनी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा मार्ग सुखकर करावा असे प्रतिपादन उद्योजक केतनभाई शहा यांनी व्यक्त केले.
सम्राट चौकातील रावजी सखाराम कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक संजय जोशी, निलीमा शिरसाठ, अमर देशमुख, हेमंत पवार उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की विद्यार्थ्याना विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध असतात. कुटुंबीय व नातेवाईकांच्या इच्छेखातर ते नावडीची विद्याशाखा निवडतात परंतु त्याच्या पदरी निराशा येते म्हणून स्वतःच्या आवडीनुसार विद्याशाखा त्यांनी निवडली पाहिजे.

