अफरीन फातिमा अवघी २२ वर्षांची पोर, जेएनयू विद्यार्थी युनियनची काउन्सेलर, सक्रिय मानवी हक्क कार्यकर्ती. सीएए- एनआरसी विरुद्धच्या आंदोलनात शाहीन बाग आणि अलाहबादमध्ये आफरीन सामील होती. कर्नाटकातल्या हिजाब बंदीविरोधातही तिने आवाज उठवला होता. ‘आपला लढा या मुस्लिमद्वेष्ट्या सरकारविरोधात आहे, पण त्याहीपेक्षा इथल्या प्रत्येकाच्या आत्मविश्वास आणि स्वाभिमानासाठी आम्ही लढतोय’, असे ती म्हणायची. ‘प्रयागराज’मध्ये झालेल्या आंदोलनाचं निमित्त करून भाजपा सरकारने आफरीनच्या घरावर बुलडोझर चालवला! आफरीन आणि तिचे वडील यांना ‘प्रयागराज हिंसे’चे आरोपी करण्यात आले. या देशात यादवी माजली असल्याचे हे लक्षण आहे. विरोधात उठू पाहणारा आवाज दाबण्यासाठी नीचतम पातळी गाठली जात आहे. हा देश कधीच असा नव्हता, या देशाचे राजकारण कधीच एव्हढे गलिच्छ नव्हते. हे सारं एक दिवस सर्व भारतीयांना गोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही.

