बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भारतभरच नव्हेतर जगभर गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४व्या सीझनमध्ये शुक्रवार, १४ ऑक्टोबररोजी रात्री ९ वाजता बुलढाणा माहेर व चिखली सासर असणार्या सौ.वैदेही अविनाश असोलकर या दिसणार आहेत. ज्या नऊ स्पर्धकांची ‘फास्टेस्ट फिंगर’साठी ‘प्ले अलाँग’गटातून निवड झाली आहे, त्यात वैदेही यांचा समावेश होणे, ही बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
‘कौन बनेगा करोडपती’साठी बुलढाण्याच्या वैदेही असोलकर!

