प्रियंकाने केला कठीण बाळंतपणाचा सामना

editor 1 Min Read
1 Min Read

पोरीचे नाव ठेवले मालती-मेरी चोप्रा-जोनस

मुंबई (प्रतिनिधी) – मुलीचा जन्म देताना अभिनेत्री तथा विश्वसुंदरी प्रियंका चोप्रा-जोनस हिने पुनर्जन्म अनुभवला आहे. तिने कठीण परिस्थितीचा सामना केला. कदाचित उशिराच्या बाळंतपणामुळे तिच्यावर ही वेळ आली असावी. प्रियंका तब्बल १०० दिवस आयसीयूमध्ये होती, ही माहिती तिचा पती निक जोनस यानेच एका मुलाखतीत देत, पत्नी प्रियंकाबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त केले. या दाम्पत्याने पोरीचे नाव मालती-मेरी चोप्रा-जोनस असे हिंदू-ख्रिश्चन मिक्स ठेवले आहे.
पोरगी जन्माला आली आणि घरी आली यासारखे मोठे सुख नाही, असे आता बाप झाल्यानंतर वाटते आहे. परंतु, या बाळंतपणात पत्नी प्रियंकाला असंख्य वेदनांना सामोरे जावे लागले, असे अभिनेता तथा गायक असलेल्या निक जोनस याने या मुलाखतीत सांगितले. आता छोटे बाळ घरी असल्याने मला प्रत्येक दिवस सरप्राईझचा उजाडतो, असेही तो म्हणाला. प्रियंका चोप्रा व निक जोनस ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी आहे. २ डिसेंबर २०१८ रोजी उदयपूर येथे शानदार सोहळ्यात या दोघांनी हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली होती. तर जानेवारी २०२२ मध्ये प्रियंकाने आपला गर्भवती असल्याची गूड न्यूज दिली होती.

Share This Article
Exit mobile version