शिवसेनेचे विभाग प्रमुख कृष्णा दिघे यांच्यावर जीवघेणा हल्ला

editor 1 Min Read
1 Min Read

रायगड (जिल्हा प्रतिनिधी) – सुधागड तालुक्यातील वावळोली येथे शिवसेनेचे विभाग प्रमुख कृष्णा दिघे यांच्या वर जमिनीच्या वादातून जीव घेणा हल्ला करण्यात आला . सदर हल्‍ल्‍यात वावळोली येथील फाळे पितापुत्राने हाताबुक्क्याने मारहाण करून पुत्राने कैचीने भोसकून दिघे यांना जखमी केले आहे.

कृष्णा दिघे यांच्या वावळोली येथील जागेला लागून संजय फाळे यांची जागा आहे. या जागेसंदर्भात दिघे व फाळे यांच्यात वाद सुरू आहेत. या जागेत संजय फाळे टपरी बांधण्याचे काम करत होते. यावेळी दिघे यांनी त्यांना या वादग्रस्त जागेत बांधकाम का करतो अशी विचारणा केली. याचा राग येऊन संजय फाळे यांनी कृष्णा दिघे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्याचवेळी फाळे यांच्या मुलाने कृष्णा दिघे यांच्या पाठीत कैची भोसकुन त्यांना पाईपवर ढकलले आणि दोघांनी दिघे यांना हाताबुक्क्याने मारहाण केली. जखमी कृष्णा दिघे त्यांच्या तावडीतून सुटून मोटारसायकलने पाली पोलीस स्थानकात तक्रात देण्यासाठी आले. तेथून त्यांना उपचारासाठी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. पुढील उपचारासाठी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. फुफुसाला इजा व अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याने दिघे यांना तेथून कोपरखैरणे येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाली पोलीस करीत आहेत

 

Share This Article
Exit mobile version