‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मराठवाडा सहसंपादक गणेश मुंडेंसह विविध क्षेत्रातील निवडींबद्दल पत्रकारांचा सन्मान

editor 1 Min Read
1 Min Read

उदगीर (तालुका प्रतिनिधी) – येथील पत्रकारांचा विविध क्षेत्रातील निवडीबद्दल तसेच विविध पुरस्कारांनी सन्मान झाल्याबद्दल स्थानिक पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभले. ब्रेकिंग महाराष्ट्रच्या मराठवाडा सहसंपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल गणेश मुंडे यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.

स्टार दर्पण न्यूजचे संपादक सुनील हावा पाटील यांना लिंगायत महासंघ महाराष्ट्रच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘समाज भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवपदी दैनिक सकाळचे प्रतिनिधी सचिन शिवशेट्टे यांची निवड झाल्याबद्दल, तसेच गणेश मुंडे यांची ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियाच्या मराठवाडा विभाग सहसंपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया, मराठी पञकार संघाचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, संयोजक माधव अनवले, संगम पटवारी, नागनाथ गुट्टे, बसवेश्वर डावळे, प्रा.राजेद्र चव्हाण, एम.एस.डब्लू प्रशांत गायकवाड, गणेश जोगदंड, दत्ता गायकवाड, श्याम मोदानी, जावेद शेख, फयाज फारखी व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version