बुलढाणा पालकमंत्र्यांच्या पहिल्या दौऱ्याचा श्रीगणेशा छत्रपती शिवराय मंदीर भूमिपूजनाने!

editor 4 Min Read
4 Min Read
राजेंद्र काळे
बुलढाणा – शिवराय अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात अर्धा भारत पादाक्रांत करुन ‘छत्रपती’ बनले. संभाजी राजेंना केवळ ३२ वर्षाचे आयुष्य मिळाले, त्यात त्यांनी अनेक लढाया जिंकून विपूल ग्रंथनिर्मितीही केली. राजाराम महाराजांनीही ३१ वर्षाच्या कमी आयुष्यात अनेक विक्रम केले. अशा छत्रपती घराण्याला जर उदंड आयुष्य लाभले असते तर पूर्ण भारतात त्यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करुन, अखंड हिंदुस्थान काय असतो? हे दाखवून दिले असते. अशाच पराक्रमांनी छत्रपती शिवराय हे शक्ती व भक्तीचे प्रतिक ठरतात, म्हणूनच त्यांचे मंदिर एक दैवत म्हणून उभारण्याचा संकल्प आज पूर्णत्वास जात असल्याचा आनंद धर्मवीर आ.संजय गायकवाड यांनी करुन, शहरातील वार्ड क्र.८ मध्ये तब्बल १५कोटींच्या विविध कामांचे भुमिपूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील दुसरे तर महाराष्ट्रातील पहिले मंदिर असून, त्याचे भुमिपूजन नव्याने नेमलेले पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले. विशेष म्हणजे पालकमंत्री बनल्या-वर गुलाबराव आज पहिल्यांदा जिल्ह्यात आले, अन् त्यांनी पहिली विकासाची कुदळ मारली ती छत्रपती शिवाजी महाराज मंदिरासाठी, हा श्रीगणेशा!
राजमाता चौकात शनिवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे भुमिपूजन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आ.संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, हिंदूशिवगर्जनेचा कार्यक्रम मेहकर व चिखली येथे असल्याने भुमिपूजन करुन ना. पाटील निघून गेले. त्यानंतर बोलतांना आ.संजय गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंदिराच्या माध्यमातून लहानपणी खेळतांना छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे जे स्वप्न बघितले हाते, त्या स्वप्नाचेच आज भुमिपूजन होत आहे. छत्रपतींचं कार्य हे रयतेसाठी होतं, अन् रयतेच्या कल्याणाचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेऊनच बुलढाणा मतदार संघात विकासाची कामे सुरु केली आहेत. या शहरात महापुरुषांची जी स्मारके आकाराला येत आहे, त्या स्मारकांच्या माध्यमातून एक प्रेरणादायी कार्य होऊन स्पूâर्तीदायी राहिल. कोणी विचारही करु शकणार नाही, अशा स्मारकांची निर्मिती होत असून त्यासाठी नगरविकास मंत्री असल्यापासून ना.एकनाथ शिंदे यांनी जो भरघोस निधी दिला.. त्याच माध्यमातून आता ते मुख्यमंत्री बनल्यावर विकासाला गती आली आहे. शहरातील २४ तास पाणी देणारी योजना पुढच्यावर्षी पुर्णत्वाला येईल. याशिवाय प्रत्येक प्रभागात करोडो रुपयांचा निधी देऊन जी विकासकामे प्रगतीपथावर आहे, त्यामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही.. असा विश्वास आ.गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी मंचावर शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष राजेश हेलगे, पी.एम.जाधव, डॉ. राहूल मेहेत्रे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, युवा नेते कुणाल गायकवाड, डॉ.दुर्गासिंग जाधव व पत्रकार सुधाभाऊ अहेर तथा राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती. तर सुत्रसंचालन पत्रकार रणजितसिंह राजपूत यांनी केले. यावेळी वाढदिवस असल्याने नगरसेवक आशिष जाधव यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्षा सौ.पुजाताई गायकवाड व वैशाली ठाकरे याही यावेळी उपस्थित होत्या.
तत्पूर्वी आ.संजय गायकवाड यांचेहस्ते प्रभाग  क्र.८मध्ये १५ कोटींच्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकणे २.५० कोटी रुपये, राजमाता चौक ते क्रीडा संकुलपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे रुपये ७.२० कोटी रु, क्रीडा संकुल ते जांभरून रोड खडीकरण-डांबरीकरण १.३२ कोटी रुपये, क्रीडा संकुल चौकापासून ते राणा मंडप डेकोरेशन पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे रुपये ७२ लक्ष, वावरे दुकानापासून ते संजुभाऊ शेतापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण ४० लक्ष, सरोदे ते गाठे घरापर्यंत काँक्रीटीकरण २१.५० लक्ष रुपये या कामासह विविध ठिकाणी रस्ता कॉंक्रिटीकरण, खडीकरण व नाली बांधकाम करणे अशा १५ कोटी रुपये किमतीच्या विकास कामाचा भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुन्ना बेंडवाल, पृथ्वीराज गायकवाड, निलेश भुतडा, सुनील भाग्यवंत, विलास काका,  रामेश्वर वावरे, उमेश कापुरे, मोहन पऱ्हाड, विजय जायभाये, बाळासाहेब धूड, दिपक सोनुने, उदय देशपांडे, रमेश गायकवाड, कैलास माळी यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Share This Article
Exit mobile version