विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

editor 1 Min Read
1 Min Read

चिखली (तालुका प्रतिनिधी) – अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील रोहडा येथे दारूच्या नशेतील भगवान भावसिंग शिराळे (वय ४०) रा. रोहडा हा व्यक्ती विहिरीत बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ हे करत आहेत.

रोहडा गावापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीत भगवान शिराळे या ४० वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती प्रवीण भगवान शिराळे याने अंढेरा पोलिस ठाण्यात दिली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहिरीबाहेर काढला व उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास ठाणेदार हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शिरसाठ हे करत आहेत.

Share This Article
Exit mobile version