नांदेड जिल्ह्यातील आदिवासी वसतीगृहांची प्रवेश क्षमता वाढवा!

editor 1 Min Read
1 Min Read

– आदिवासींच्या शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा

भोकर, जि. नांदेड (तालुका प्रतिनिधी) – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किंवा अंतर्गत येणार्‍या शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची आफ्राेट संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष अरूण जी. डाखोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दि.२२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर करण्यात आले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत येणार्‍या नांदेड जिल्ह्यातील आदिवासी वसतीगृहांची विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविणे या विषयी माहिती देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाढती संख्या लक्षात घेता, प्रत्येक वसतीगृहातील प्रवेश क्षमता वाढविणे गरजेचे आहे. आश्रम शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान शाखा सुरू करण्यात यावी. डीबीटी आणि शिष्यवृत्तीचे पैसे तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे, आदिवासी समाजाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.  आफ्राेट संघटना शिष्टमंडळाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष अरूणकुमार डाखोरे, सचिव अ‍ॅड.गणेश तोरकड, आफ्राेट संघटना भोकर तालुका अध्यक्ष शेषराव हुरदूके, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच वाळकेवाडी संजय माझळकर यांची यावेळी उपस्थिती होती.

Share This Article
Exit mobile version