शहादा तालुक्यातील ११५० महिलांना उज्वला योजनेतील गॅस शेगडीचे वाटप

editor 1 Min Read
1 Min Read

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – शहादा तालुक्यातील मंदाने परिसरातील उज्वला गॅस योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना मंदाणे येथील कार्यक्रमात गॅस शेगडी वाटप खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

महिलांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने केंद्र सरकारने उज्वला योजना सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अनेक गरजू लाभार्थी योजनेपासून वंचित होते. खासदार गावित यांनी पाठपुरावा करून नंदुरबार जिल्ह्याला दुसर्‍या टप्प्यातही सहभागी करून घेतला असून, शहादा तालुक्यातील विविध गावातील निवड झालेल्या ११५० लाभार्थ्यांना दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात गॅस शेगडी वाटप खासदार हिना गावित यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ज्या कुटुंबांना अजूनही गॅस कलेक्शन मिळाले नाही त्यांनी उज्वला योजनेसाठी अर्ज करावेत. दुसर्‍या टप्प्याचे मुदत डिसेंबर अखेरपर्यंत असल्याने गरजूंनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळेस केले.
———–

Share This Article
Exit mobile version