खामगाव येथील जनुना तलावात युवकाचा मृतदेह आढळला

editor 1 Min Read
1 Min Read

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी): खामगाव येथील जनुना तलावात १६ जून रोजी सकाळी 34 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे..
प्राप्त माहितीनुसार आज, १६ जून रोजी खामगाव येथील जनुना तलावाच्या काठावर कुणीतरी चपला काढलेल्या आल्याचे स्थानिकांना दिसले. त्यामुळे कुणीतरी तलावात उडी घेतली असावा संशय नागरिकांना आला. त्यामुळे नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व शोधमोहीम राबविली. त्यावेळी तलावात ३४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. यावेळी पोलीसांनी तपास केला असता योगेश देविदास चोपडे रा. फरशी असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. मात्र योगेश चोपडे याने आत्महत्या केली की घातपात? याबद्दल अजून स्पष्टता नाही. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Share This Article
Exit mobile version