चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे सर्वज्ञ प्रवीण खेडेकर या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी करणारे माकड अखेर वनविभागाच्या अधिकार्यांनी पकडले आहे. अंचरवाडी सर्कलचे वनअधिकारी पठाण व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. विद्यार्थ्यावरील हल्ल्याची बातमी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केली होती. त्याची दखल घेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे.
या पथकाने विद्यार्थ्यावर हल्ला करणारे माकड चोवीस तासांच्याआत पकडले. याप्रसंगी गावातील वसंतराव तुळशीराम खेडेकर, प्रल्हाद पाटील खेडेकर, गजानन रामराव माळेकर, भगवानराव चेके, शिक्षक इंद्रजीत खेडेकर, योगेश खेडेकर, गजानन संतोष मळेकर, आरिफ सर कॉन्व्हेंट शिक्षक, राम सदाशिव माळेकर, सतीश मदन खेडेकर, विठ्ठल माळेकर यांनी याप्रसंगी या रेस्क्यू टीमला सहकार्य केले. या पथकाने सर्वज्ञ खेडेकर या विद्यार्थ्याच्या घरी जावून त्याच्या तब्येतीचीदेखील चौकशी केली.या कामगिरीमुळे अंत्री खेडेकर शाळा समिती व शिक्षकवृंद यांच्याकडून वनविभागाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. पकडलेल्या या माकडाला बेशुद्ध करून पकडावे लागले, त्यानंतर ते शुद्धीत आल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले आहे.
——————

