संभाजी ब्रिगेडचा नांदुरा येथे रस्ता रोको

editor 1 Min Read
1 Min Read

नांदुरा (तालुका प्रतिनिधी) – फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड नांदुराच्यावतीने तालुकाध्यक्ष अमर पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

फॉक्सकॉन-वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी आर्थिकदृष्ट्या व १ लाख युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून, गल्लीच्छ राजकारणामुळे व महाराष्ट्राच्या द्वेषापोटी हा प्रकल्प गुजरालता नेला गेला. तो परत महाराष्ट्रात येत नाही, तोपर्यंत संभाजी ब्रिगेडच्यावतीने आक्रमक आंदोलन सुरूच राहील, असे वक्तव्य अमर पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांडव व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version