आळंदीत ३४ वर्षानी भेटले शिक्षक, माजी विद्यार्थी

editor 1 Min Read
1 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील सन १९८७ – १९८८ या वर्षांतील दहावी ब चे माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या स्नेह मेळाव्यात तब्बल ३४ वर्षांनी शिक्षक, विद्यार्थी भेटले. या स्नेह मेळाव्यास प्रशालेचे माजी शिक्षक एस.आर.नाईकरे, टी.आर.मंजुळे, एन.जी.साठे, एच.ए.शेख, पी.व्ही.थोरात, आर.एन. चव्हाण, आनंद मोहिते, एल.बी.आन्द्रे, एच.व्ही.पारख, एल.जी घुंडरे, बी.बी.फडके, जे.के.शिर्के, जे.बी.काळे, विनायक उपासनी, वडगणे सर आदी शिक्षक उपस्थित होते.

या मेळाव्यात उपस्थित शिक्षकांचे औक्षण करून गुरुपूजन करण्यात आले.  जे शिक्षक विद्यार्थी देवाघरी गेले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. शाल, श्रीफळ, पूर्ण पोशाख देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक भारावून गेले.  यावेळी माजी विद्यार्थी यांनी आपापला परिचय करून देत जुन्या आठवणीं सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विविध ठिकाणाहून विद्यार्थी या कार्यक्रमास आले होते. यावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन करीत आशिर्वाद दिले. यावेळी दिवंगत शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांना श्रांद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरूची भोजनाचा आस्वाद घेत संध्याकाळी स्नेह मेळाव्याची सांगता झाली. यावेळी किरण गायकवाड, प्रकाश भागवत यांनी मनोगते व्यक्त केली. उदय सांडभोर, गोपाळ खैरे, संजय चौधरी, नितीन थोरात, संजय तापकीर यांचे सह सर्व माजी विद्यार्थी यांनी मेळावा यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. यास सर्वाचे सहकार्य केले. प्रास्ताविक बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विजय गुळवे, प्रिती बंब यांनी केले.

Share This Article
Exit mobile version