पेडगाव फाट्यावर भीषण अपघात, ११ प्रवासी जखमी, ६ अत्यवस्थ

editor 1 Min Read
1 Min Read

अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – नागपूर-औरंगाबाद द्रूतगती महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव फाट्यावर मिनी ट्रक आणि क्रूझर गाडी यांच्यात भल्या पहाटे भीषण अपघात होऊन ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सर्व जखमींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अकोला, वाशिम जिल्ह्यातून जात असलेला नागपूर-औरंगाबाद हा द्रूतगती महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथे भल्या पहाटे मिनी ट्रक व क्रूझर गाडी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनातील ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातस्थळी श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने तातडीने पोहोचून जखमींना मदत केली. अकोला येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

Share This Article
Exit mobile version