पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत साकारली गेली २३४० चौरस फुटांची रांगोळी

editor 1 Min Read
1 Min Read

– रांगोळी साकारण्यासाठी लागले तब्बल ७ तास ४९ मिनिटे
– इंडिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त अमरावती येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त रांगोळी आर्टिस्ट माधुरी सतीश सुदा आणि त्यांच्या १७ कलाकारांनी तब्बल २३४० चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारून पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. ही भव्य रांगोळी साकारण्यासाठी श्रीमती सुदा व त्यांच्या टीमला तब्बल सात तास ४९ मिनिटे इतका वेळ लागला. या रांगोळीत त्यांनी मोदी सरकारच्या काळात राबविल्या गेलेल्या ७२ योजनांचा सचित्र उल्लेख करण्यात आला आहे.

ही रांगोळी साकारण्यासाठी माधुरी सुदा यांना त्यांच्या सहकारी गती सुदा, शुभम सुदा, शुभी केला, काजल साबू, शीतल पटेरया, मनीषा भतूड़ा, पूजा करवा, शुभम गावंडे, दिप्ती करवा, उन्नती राठी, सोनाली पाटील, नेहा राठी, अंजली खत्री, रुपाली गायकवाड़, पंकज देशपांडे, सागर विश्वकर्मा, कल्याणी मंत्री यांनी सहकार्य केले.

Share This Article
Exit mobile version