चिखली (तालुका प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांच्या विविध समस्यांसाठी कार्यरत असलेली भारत सरकार नोंदणीकृत भारत सरकार माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा बुलढाणा ग्राहक उपभोक्ता समितीच्या पदाधिकार्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे. सदर ही निवड ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी ऑनलाइन केलेली आहे. तसेच अध्यक्ष नागपूर विभाग विदर्भ राजेंद्र लहाने यांनी ही नियुक्ती केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी मेरा बुद्रुकचे सुनिल भाऊ अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

