ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा सहसचिवपदी निलेश कोल्हे; जिल्हा संपर्क प्रमुखपदी राधेश्याम काळे

editor 1 Min Read
1 Min Read

अंत्री काेळी, ता. चिखली (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांच्या विविध समस्यांसाठी कार्यरत असलेली भारत सरकार नोंदणीकृत असलेली जिल्हा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हा सहसचिव पदी निलेश कोल्हे व जिल्हा संपर्क प्रमुख पदी राधेश्याम काळे यांच्या नियुक्ती करण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा ग्राहक उपभोक्ता संरक्षण नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यां चे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

बुधवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांच्या विविध समस्यांसाठी कार्यरत असलेली भारत सरकार नोंदणीकृत असलेली जिल्हा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे .त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. जिल्ह्यात ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकी संदर्भात तसेच त्यांच्या न्याय हक्कासाठी हे संघटन काम करणार असून, त्याकरिता काम करणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी विदर्भाध्यक्ष राजेंद्र लहाने, जिल्हाध्यक्ष राजीव जाधव , सचिन खंडारे , सुनील डोंगरदिवे, शिवाजी मोरे , निलेश कोल्हे , राधेश्याम काळे , समाधान सरकटे , सुनील अंभोरे , शुभम खरे व एडवोकेट चंद्र किशोर इंगळे , विष्णू नवघरे उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version