श्री समर्थ स्कूल अ‍ॅण्ड कॉलेजच्या १० मुलांची भारतीय नेव्हीत सब लेफ्टनंट मुलाखतीसाठी निवड

editor 1 Min Read
1 Min Read

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील चिंबळीतील श्री समर्थ स्कूल अ‍ॅण्ड कॉलेजच्या १० मुलांची भारतीय नेव्हीत सब लेफ्टनंट लेफ्टनंट पदाच्या मुलाखतीस निवड झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गवारे, सचिव विद्या गवारे यांनी दिली.

मुलाखतीस निवड झाल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी शाळेस प्रथम येऊन भेट देत माहिती दिली. मुलाखतीस निवड झालेल्या १० मुलांमध्ये अरमान अहमद, आशिष कापसे, श्रेयश गायकवाड, साहिल शिंदे, आरिष पटेल, अजय कदम, आर्यन घोडके, जडेन रिबेलो, पार्थ फणसेकर, प्रथमेश परब यांचा समावेश आहे. या सर्व मुलांचे श्री समर्थ स्कूल अ‍ॅण्ड कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारे, कॉलेजच्या सचिव विद्याताई गवारे यांनी सर्वांचे कौतुक करत, पुढील काळात त्यांनी अशीच गरुड भरारी घ्यावी. या मुलांनी आपल्या कुटुंबाचे, शाळेचे आणि गावाचे नाव देशात उंचवावे अशी सदिच्छा व्यक्त केली. शाळेच्या मुख्यापिका अनिता टिळेकर यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत भविष्यात आणखी यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यानी येणार्‍या काळात अशीच गगन भरारी घ्यावी, अशी आशा प्रशाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी व्यक्त करत मुलांचे कौतुक केले.

Share This Article
Exit mobile version